रवींद्र धनक यांचे सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशी मागे

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन (धर्मा मैड) – शिरुर येथील कृषी लोक विकास संशोधन संस्थेच्या जीवन विकास मंदीर ,माध्यमिक विभाग शाळेच्या सार्वजनिक वापरासाठी सर्व्हे नं. ११४० मधील २१ आर. जागेसाठी नाहरकत देण्याचा ठराव शिरुर नगरपरिषदेच्या विशेष सभेत नगराध्यक्ष वैशाली वाखारे व उपस्थित नगरसेवकांनी मंजूर केल्याने शिरुर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक व सुभाष जैन यांनी शिरुर नगरपरिषदेसमोर दि. १५ जुलै २०१९ पासुन सुरू केलेले बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.

शिरुर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी
शिरूर नगरपरिषदेने विशेष सभा घेऊन सर्वे नंबर ११४० या जागेवरील आरक्षण काढणारा ठराव करावा आणि जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासन,नगर विकास खात्याचे संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वनखात्याचे अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वे नंबर११४० पैकी एक हेक्टर सरकारी जागेमध्ये शैक्षणिक उपक्रमाला तात्पुरती जागा द्यावी ,संडास बाथरूम उभारणी करिता जागा द्यावी व पाण्याचे कनेक्शन द्यावे.

या मागणीसाठी बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.या मागणीनुसार नगरपरिषदेच्या वतीने काल दि. १६ रोजी दुपारी तीन वाजता नगरसेवकांची विशेष सभा बोलविण्यात आली होती. परंतु गणसंख्ये अभावी ही विशेष सभा तहकुब करुन आज दि १७ रोजी सकाळी साडेअकरा वाजता मुख्याधिकारी अ‍ॅलिस पोरे यांच्या उपस्थितीत ही विशेष सभा घेण्यात आली. या विशेष सभेत शिरुर नगरपरिषदेच्या विकास योजना दुसरी सुधारित मध्ये सर्व्हे नं. ११४० येथे दर्शविलेली व कार्यान्वित असलेल्या जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या व तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारा रस्ता यासाठी दिलेले क्षेत्र तसेच फळ व भाजी मार्केट करिता आवश्यक असणारे क्षेत्र अबाधित ठेवून शिल्लक क्षेत्रावर कृषी लोक विकास संशोधन संस्था, शिरुर यांच्या जीवन विकास मंदीर, माध्यमिक विभाग या शिरुर येथील शाळेच्या सार्वजनिक वापरासाठी सर्व्हे नं. ११४०मधील उर्वरित २१आर. जागेसाठी नाहरकत देण्याचा ठराव उपस्थित नगराध्यक्ष वैशाली वाखारे, नगरसेवक मुज्जफर कुरेशी, विठ्ठल पवार, सचिन धाडीवाल, संजय देशमुख, निलेश गाडेकर, विनोद भालेराव, नितीन पाचर्णे, मंगेश खांडरे, अभिजीत पाचर्णे नगरसेविका उज्वला बरमेचा, मनिषा कालेवार, रोहिणी बनकर, उज्वला वारे, संगिता मल्लाव, ज्योती लोखंडे, सुनीता कुरंदळे, सुरेखा शितोळे, रेश्मा लोखंडे, अंजली थोरात, पुजा जाधव यांनी सर्वानुमते मंजूर केला.

या ठरावाची प्रत आंदोलनकर्ते संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक रविंद्र धनक यांना नगराध्यक्ष वैशाली वाखारे, मुख्याधिकारी अ‍ॅलिस पोरे यांच्या सह विशेष सभेला उपस्थित नगरसेवक व नगरसेविका यांनी आंदोलन स्थळी येऊन दिले. नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वनगरसेवक यांची ही सकारात्मक भुमिका पाहून रविंद्र धनक यांनी आपले सहकारी सुभाष जैन यांच्या सह अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना नगराध्यक्ष वैशाली वाखारे व मुख्याधिकारी अ‍ॅलिस पोरे यांच्या हस्ते लिंबूपाणी देण्यात आले.

रविंद्र धनक यांनी गेले तीन दिवस सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या व उपस्थित नागरीक यांचे आभार मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !