‘पीआरडी चषक’ स्पर्धेमुळे शिरूरला राज्यात मानसन्मान : नगराध्यक्ष वैशालीताई वाखारे

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह जिल्ह्यामध्ये शिरूर शहराला मानसन्मान मिळवून देणारी नगराध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल (पीआरडी चषक) चषक क्रिकेट स्पर्धा असल्याचे मत शिरूर नगराध्यक्ष वैशालीताई वाखारे यांनी व्यक्त केले.

शिरूर येथील रयत शाळेच्या मैदानावर माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी उद्योगपती कै. रसिकलाल धारिवाल व शिवमंदिराचे माजी सचिव कै. केशर सिंग परदेशी यांच्या स्मरणार्थ नगराध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी नगरसेवक संतोष भंडारी, शिवसेवा मंडळ ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर योगेश उपलेंचवार, विश्वस्त श्रीनिवास परदेशी, बांधकाम व्यावसायिक सुभाष गांधी, आदित्य पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद धाडीवाल, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, नगरसेवक विठ्ठल पवार, संदीप गायकवाड, यशवंत पाचांगे, दादाभाऊ वाखारे, तुकाराम खोले, संतोष शितोळे, प्रदीप बारावकर, किरण बनकर, स्पर्धेचे आयोजक रवींद्र ढोबळे प्रशांत शिंदे, बिजवान शिंदे, राजेंद्र ढोबळे,सनी दळवी, अमोल पवार दगडू त्रीमुखे, सुशांत कुटे, रुस्तुम शेख, जयवंत साळुंके, तिरंगा बिर्याणी चे फिरोज शेख, श्रीहरी नरवडे, विजय ढोबळे, सागर नरवडे, निलेश कोळपकर, तेजस माने, ऋतिक ढोबळे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

शिरूर शहराला क्रिडांगणाची आवश्यक असून रवींद्र ढोबळे माजी नगराध्यक्ष यांनी क्रिडांगणाची कमी भरून काढून शिरूर शहरात अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. यामुळे क्रीडांगण पाहिले तर इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धेची आठवण होते असे मत शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी व्यक्त केले.

शिरुर शहरामध्ये अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून नागरिकांना क्रिकेट चाहत्यांना एक चांगली क्रिकेट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिले असल्याचे मत पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा –