शिरुर येथील सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांची निवड अपात्र

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील आंबळे येथील सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांनी निवडणूक खर्च विहीत वेळेत व रित यामध्ये सादर न केल्याने त्यांचे ग्रामपंचायत आंबळे येथील सरपंच पद रद्द ठरविले असल्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढल्याची माहिती प्रतिस्पर्धी उमेदवार व तक्रारदार महेश नारायण बेंद्रे यांनी दिली.

याबाबत तक्रारदार महेश नारायण बेंद्रे व तपन अनिल बेंद्रे यांनी तक्रार केली होती त्या नुसार महेश बेंद्रे यांनी दिलेली माहिती अशी की, आंबळे येथील ग्रामपंचायत निवडणूक दि. २६ सप्टेंबर २०१८रोजी होऊन त्या निवडणूकीचा निकाल दिया. २७ रोजी लागला त्यात सरपंचपदी सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांची ‌निवड झाली तदनंतर तक्रार दार यांनी सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांनी निवडणूक खर्च वेळेत सादर केला किंवा कसे काय याबबातची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व माहिती अधिकारी याच्या कडून माहिती अधिकारात घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रार दार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) मधील तरतूदी नूसार अपील दाखल केले या अपिला चा निर्णय दि. 2 मे रोजी लागला. यात सरपंच सोमनाथ शिवाजी बेंद्रे यांनी राज्य निवडणूक आयोगाने दि. १५ ऑक्टोबर २०१६ नुसार निर्धारित केलेल्या विहीत वेळ व रित यामध्ये सादर न केल्यामुळे
त्यांचे आंबळे येथील सरपंच पद रद्द ठरवून या आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अनर्ह ठरविण्यात आल्याचे आदेश निकाल पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणी तक्रार दार याच्या वतीने
अ‍ॅडव्होकेट शिवशंकर हिलाळ यांनी काम पाहिले.