आयोध्येत राम लल्लाचे ‘दर्शन’ घेतल्यानंतरच शिवसेनेचे खासदार घेणार लोकसभेत ‘शपथ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे नवर्निर्वाचीत खासदार १६ जूनला आयोध्येला जाणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आपल्या खासदारांसोबत आयोध्येत जाणार आहे. या ठिकाणी ते राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. राम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संसदेत शपथ घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती झाली. राज्यामध्ये युतीचे ४१ खासदार निवडून आले असून यामध्ये शिवसेनेचे १८ खासदार आहेत. येत्या १६ जूनला उद्धव ठाकरे आपल्या खासदरांसोबत आयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. आयोध्येवरून आल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांचा १७ किंवा १८ तारखेला संसदेत शपविधी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. तसेच राममंदिर उभारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला देत राम मंदिर बाधण्याची तारीख जाहीर करण्याची मागणी केली होती. हिंदू वाट बघणार नाहीत असे सांगत संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठीशी राहिल मात्र, राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा असे उद्धव ठाकरे यांनी आयोध्येत म्हटले होते.