पुण्याच्या शिवाजीनगर मतदार संघातील ‘फ्लेक्स’मुळं प्रचंड खळबळ, राजकीय वातावरण ‘तापलं’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज पासुन सुरू झाली असतानाच शहरातील शिवाजीनगर मतदार संघांत निनावी फ्लेक्समुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाजीनगर परिसरात लावण्यात आलेले फ्लेक्स सध्या चर्चेत आहेत. फ्लेक्समधून विद्यमान आमदार, खासदार यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

शिवाजीनगर मतदार संघातून गतवेळी भाजपचे विजय काळे हे निवडून आले. गेल्या काही महिन्यांपासून पक्षातीलच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरूध्द बंड केले आहे. दरम्यान, आमदारांचे तिकीट जवळपास कट झाल्यात जमा असल्याची चर्चा आहे. शिवाजीनगर मतदार संघातून भाजपसह इतर राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत.

फ्लेक्सवर लिहीलेल्या मजकूरातून आमदार विजय काळे, खासदार गिरीश बापट आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

Visit : policenama.com