राष्ट्रवादीला मोठा धक्का ! साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील अनेक आमदार आणि महत्वाचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाराजांच्या मानधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना पक्ष न सोडण्याची विनंती केली होती. शिवेंद्रराजे यांनी शनिवारी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी ‘उदयनराजेंचे मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका’, असे म्हणत पक्ष न सोडण्याची विनंती केली होती.

मात्र आता शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नक्की झाले असून आजचा यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का समजला जात आहे. यापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपल्याला पक्षात येणाऱ्या अडचणींची माहिती देखील दिली होती. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांना थांबण्याचे आणि पक्ष न सोडण्याचे आवाहन केले होते मात्र त्यांनी आपला निर्णय नक्की केला असल्याचे समजत आहे.

माजी मंत्री आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर आता नवी मुंबईमधील राष्ट्रवादीचे तगडे नेते आणि माजी आमदार गणेश नाईक हे देखील राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले हेदेखील पक्ष सोडणार असल्याने राष्ट्रवादीचा गड जवळपास संपूर्ण कोसळला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, पवारांनी त्यांना सबुरीचा सल्ला घेण्यास सांगितल्यानंतर देखील त्यांनी पवारांचें ऐकून हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –