फुकटचे श्रेय बंद करा उपमहापौरांचा शिवसेनेला टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात शिवसेना-भाजपचे सूत काही जुळेना अजूनही सेना-भाजपमध्ये धुसफुस चालूच भाजपच्या उपमहापौर मालनताई ढोणे यांचा थेट शिवसेनेवर आरोप केला आहे. फुकटचे श्रेय घेणे बंद करा, असा सल्लाच त्यांनी दिला आहे.

महानगरपालिका निवडणुकीपासून शिवसेना आणि भाजपमध्ये शहरांमध्ये चालू असलेले दिवस अद्यापही संपलेली दिसत नाही. महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. त्यानंतर सत्तास्थापनेची वेळेस शिवसेनेला बाहेर ठेवत भाजपने दिवस राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेत भाजपचा महापौर केला होता. मात्र त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेने युती करत लोकसभा आवडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

महानगरपालिका सत्तेमध्ये पुन्हा एकदा सहभागी होता येईल, असे वाटत होते. मात्र आता भाजपकडून त्याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नसल्याने आणि शिवसेना सतत भाजपवर टीका करत असल्याने भाजपच्या उपमहापौर मालन ताई ढोणे शिवसेनेवर थेट आरोप केला आहे. ‘शिवसेनेने फुकटचे श्रेय काढणे बंद करून तिच ताकद नवीन निधी मंजुरीसाठी खर्च करावी’, असा टोलाही ढोणे यांनी लगावला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच