युतीत ’50-50′ नाहीच ! शिवसेनेला फक्त 125 जागा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या विधानसभेत २८८ जागांपैकी भाजप व शिवसेना फिप्टी फिप्टी जागा लढविणार असल्याच्या बोलीवर युती झाली असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात असले तरी मित्र पक्षांना विशेषत: भाजपच्या मित्रांना जागा वाटप केल्यानंतर उरलेल्या जागा ५० -५० टक्के लढविण्यावर भाजपने शिवसेनेला तयार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेला केवळ १२५ जागा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनयात्रेत बोलताना दोन्ही पक्षाकडील त्यांच्या निवडून आलेल्या जागा कायम राहतील. एखाद दोन जागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मित्र पक्षांना जागावाटप झाल्यानंतर दोघेही पक्ष निम्म्या निम्म्या जागा लढवतील असे सांगितले होते.

त्यानुसार युतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रत्येकी २ बैठका झाल्या आहेत. त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. विद्यमान ६३ जागांसह शिवसेनेला १२० ते १२५ जागा मिळतील तर विद्यमान १२२ आमदारांसह मित्रपक्षांसह १६५ जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहे. मित्र पक्षांना २० ते २५ जागा सोडून बाकी १५० जागा भाजपा लढविणार आहे.

एक हाती बहुमत अशक्य

शिवसेनेशी युती न करता स्वतंत्र लढून केंद्राप्रमाणे एक हाती बहुमत मिळविण्यासाठी ही सर्वात चांगली संधी असल्याचे भाजपामधील एका गटाचे मत आहे. भाजपाने किमान १७० जागा लढविल्या पाहिजेत असा ज्येष्ठांचा आग्रह आहे. मात्र मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही असून किमान १६५ जागा मिळतील असे त्यांना वाटते. युतीमध्ये भाजपाच्या वाट्याला जागा कमी येत असल्याने लढविलेल्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक जागा जिंकल्याचे अशक्यप्राय आव्हान आहे. त्यामुळे भाजपाला युती केल्यास एक हाती बहुमताची शक्यता नाही, असे सांगितले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –