अखेर शिवसेना उपनेते राठोड पोलिसांना ‘शरण’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहर अभियंत्यांवर बूट फेकल्याच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन फेटाळलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड हे आज दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले. जामीन फेटाळल्यानंतरही राजकीय दबावापोटी पोलीस त्यांना अटक करत नव्हते. पोलिस दप्तरी फरार असलेले राठोड यांनी दोनदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. ही बाब ‘पोलिसनामा’ने उजेडात आणली होती. अखेर आज राठोड हे तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले.

बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामावरून झालेल्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासनोर बूट फेकून मारला होता. यावेळी अधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी राठोड यांनी चिथावणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओसह ‘पोलीसनामा’ ने वृत्त प्रसारित केले होते.

राठोड यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी राठोड याने अधिकाऱ्यावर खोट्या गुन्हा दाखल करण्याची चिथावणी दिल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर राठोड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, परिस्थितीचा अंदाज घेऊन राठोड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. पोलीस दफ्तरी फरार असताना राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

न्यायालयाने जामीन फेटाळलेला आरोपी फरार असताना खुलेआम फिरत होता. मुख्यमंत्र्यांना भेटत होता. तरी त्याला अटक केली जात नव्हती. याबाबत ‘पोलीसनामा’ ने वृत्त प्रसारित केले होते. अखेर वाढत्या वाढत्या दबावापुढे राठोड यांनी पोलिसांत हजर होण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी शिवसेना उपनेते माजी मंत्री अनिल राठोड हे स्वतःहून तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. पोलिसांकडून राठोड यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like