‘त्यांच्या’ शिवसेना प्रवेशाच्या वावड्या : शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते

अहमदनगर : शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांवर चालतो. ज्या दोन शिवसैनिकांची नगरमध्ये हत्या झाली, ही बाब अतिशय गंभीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वावड्या उठल्या आहेत. त्यांची व माझी भेटही झाली नाही व बोलणे झाले नाही. त्यांना पक्षांमध्ये घेण्याचा कोणताही संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे.

शिवसेनेचे नगर संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, विधान सभेचे जिल्हा समन्वयक सुमित कुलकर्णी, शहर प्रमुख दिलीप सातपुते, विनायक नगरचे विभाग समन्वयक शुभम बेंद्रे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

नगर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार शिवसेनेत येणार अशी चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून व अन्य माध्यमातून केली जात होती. या संदर्भामध्ये आज आम्ही मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या व सोशल मीडियामध्ये आलेल्या बातम्यांची माहिती करून दिली, असे सातपुते यांनी सांगितले.

यासंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष हा शिवसैनिकांवर चालतो, नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे कार्य मोठ्या दिमाखात उभे आहे. त्याचा आपल्याला अभिमान आहे. मात्र केडगाव येथील झालेल्या हत्याकांडामध्ये दोन शिवसैनिकांना आपला प्राण गमवावा लागला, ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणांमध्ये अनेकांची नावे सुद्धा समाविष्ट झालेले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. ते कधीही मला भेटलेले नाहीत. विधानसभेमध्ये कधीतरी ते आपल्याला दिसतात. त्यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा झालेली नाही व त्यांना प्रवेश देण्याचा कोणताही संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती मंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like