पुरंदरच्या उपसभापतीपदी सेनेचे प्रा.डॉ. गोरखनाथ मानेंची निवड, नीरेत तरूणाईचा ‘आनंदोत्सव’

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंंम्मदगौस आतार ) – पुरंदरच्या पुुर्व भागातील व बारामतीच्या पश्चिम भागात महाविद्यालयीन विध्यार्थ्यांंमध्ये एकेकाळी लोकप्रिय आसलेल व्यक्तीमत्व म्हणजे प्रा.डॉ.गोरखनाथ माने.या लोकप्रिय प्राध्यापकांची पुरंदरच्या उपसभापती निवड झाल्याने या भागातील तरुणांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

डॉ. गोरखनाथ माने हे नीरा – वाल्हे. पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदाच
निवडून आले आहेत. प्राध्यापक डॉ.गोरखनाथ माने यांच्या रूपाने पुरंदर पंचायत समितीतीला एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व लाभले आहे.

प्रा.डॉ. गोरखनाथ माने यांनी गेली ३० वर्ष सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील मु.सा काकडे महा विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले .या काळात त्यांचे काम उल्लेखनीय होते.या काळात त्यांनी हिंदी या विषयात पीएचडी मिळविली. ते सन २०१४ मध्ये सेवा निवृत्त झाले.आपल्याकडे उच्च शिक्षित लोक राजकारणात येत नाहीत.मात्र प्रा.डॉ . गोरखनाथ माने यांनी राजकारणात प्रवेश करीत पंचायत समितीच्या निवडणुकीत सहभाग घेतला.सरांच्या प्रेमळ व विध्यार्थी प्रिय स्वभावामुळे ते सहज निवडून आले. मंगळवारी (दि.३१) झालेल्या उपसभापती निवडीत प्रा.डॉ. गोरखनाथ माने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीने तरुणाई मधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे .

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?