शिवसैनिकांची प्रचाराकडे पाठ, प्रभागात संभ्रम !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 42 मध्ये पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उल्हास शेवाळे यांना माघार घ्यायला लावल्याने शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने नाराज शिवसैनिकांनी प्रचाराकडे पाठ फिरवली आहे. नाराज शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याची चर्चा परिसरात असल्याने मतदार संघात संभ्रम निर्माण झाल्याचे पहावयास मिळते.

प्रभाग क्रमांक 42 अ मधून निवडणूक लढविण्याची पुर्ण तयारी केलेल्या उल्हास शेवाळे यांना त्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या हट्टापोटी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घ्यावी लागली अशी चर्चा परिसरात आहे. अपक्ष अर्ज भरणारे उमेदवार अमोल हरपळे यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांना शिवसेनेने अधिकृतपणे पुरस्कृत केल्याचे पत्र दिले अथवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे काही शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश ढोरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते. हरपळेंच्या प्रचारात आतापर्यंत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी भाग घेतला नसल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेनेकडून इच्छूक असलेले माजी पंचायत समिती सदस्य शंकरनाना हरपळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उघडपणे प्रचार करीत असल्याची चर्चा परिसरात आहे. भाजप उमेदवार अश्‍विनी पोकळे अडचणीत आल्यामुळे भाजपच्या गोटातही अस्वस्था पसरली आहे. प्रभागातील काही शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नाराजीचा फटका आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

 

सिने जगत-

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा