‘गोड’ बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होता : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्रीपदावरुन युतीमध्ये सुरु असलेला वाद विकोपाला गेला असून दोन्ही पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदावर आपापला दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजवर घणाघाती आरोप केले आहेत. सत्तेत समान वाटा देण्याचे सांगून युती करायला लावली. निकालानंतर मात्र त्यांनी असे काही ठरलेच नव्हते असे सांगत आहे. भाजपने गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेने भाजपसोबत युती करण्याबाबत पुढाकार घेतला. अमित शहा आणि माझी बैठक शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झाली. त्यावेळी अमित शहा यांना आपण युतीसाठी तयार आहोत मात्र, सत्तेमध्ये समान वाटा मिळावा असे म्हटले होते. त्यावेळी अमित शहा यांनी मंजूर असल्याचे सांगितले होते. त्यावेळी पक्षातील इतर नेत्यांना याची कल्पना देण्यास सांगितले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच याबाबत बोलायला नको नाहीतर भाजपमधील नेते नाराज होतील असे सांगितले होते. शिवसेना कधीही खोटं बोलत नाही आणि खोटे आरोप सहन करत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचे आरोप करण्यात आले आहेत. शहांच्या उपस्थितीत समान वाटपाचा फॉर्म्युला ठरला असताना आता असा कोणताच फॉर्म्युला ठरला नसल्याचे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या नावाचा वापर करून शिवसेनेवर खोटारडेपणाचे आरोप करीत आहेत. 2014 च्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढलो होतो. त्यावेळी देखील त्यांचा सत्तेचा घोडा आम्ही आडवला होता. आतातर आम्ही एकत्र निवडणूक लढवली आहे. सत्तेची लालसा एवढ्या खालच्या थराला जाईल असे वाटल नव्हंत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके