मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची घेतली ‘भेट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतीबाबत चौकशी देखील केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. याच दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. भेटी दरम्यान राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यात चर्चा देखील झाली. मात्र या भेटीबाबत राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले.

तसेच या भेटी बाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ठाकरे कुटुंबाशी सुरुवातीपासून जिव्हाळ्याचे संबध आहेत. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ति पुण्यात आला की माझी भेट होत असते. तर राज ठाकरे हे पुण्यात आल्यावर आज मला भेटण्यास आले. त्यांनी माझ्या तब्येती बदल विचारपूस केली असून राज ठाकरे हे नेहमी भेटण्यास येत असल्याचे यावेळी सांगितले.