भोकर तालुक्यातील पाळज येथील श्रीगणेश मंदिरास तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – ७१ वर्षाची परंपरा असलेल्या गणेश मंदिरास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी जूनी मागणी होती. भाविकांच्या भावनिक मागणीची दखल घेत नवनिर्वाचित खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी शासन दरबारी पाठपूरावा करत पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकित तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यात यश संपादन केल्याने भाविकातून आनंद व्यक्त होत आहे.

भोकर तालूक्यातील तेलंगणा सिमेवर असलेल्या पाळज येथे जाज्वल्य श्रीगणेशाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिरातील गणपतीची मूर्ती लाकडापासून बनवलेली आहे केवळ गणेशोत्सवाच्या काळातच या मूर्तीचे भावीकांना दर्शन घडते. नवसाला पावणारा म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा आंध्रप्रदेश कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात भावीक गर्दी करतात.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भावीकांना अन्नदान व सोयी सूविधा मंडळाच्या वतीने पूरविल्या जातात. तालूक्यातील अतिमहत्वाचे असलेल्या या स्थानाचा विकास व्हावा यासाठी तिर्थ व पर्यटनक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी मागणी अनेक वर्षापासून होती. परंतू सदर रास्त मागणी दूर्लक्षितच राहिल्याने या भागाचा निधिअभावी म्हणावा तसा विकास झाला नाही. नवनिर्वाचित खा.चिखलिकर यांनी प्रचारशूभारंभी दिलेल्या वचनाची पूर्तता करत मा.मुख्यमंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने प्रश्न उपस्थित करुन नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकित पाळज येथील गणेश मंदिरास तिर्थ व पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यास यश संपादन केल्याची माहीती भाजपा तालुका अध्यक्ष गणपत पिटेवाड, जि.प.सदस्य दिवाकररेड्डी सूरकूंटवाड, यांनी दिली.

तिर्थ व पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनासह खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचे नागनाथ घिसेवाड, राजा खंडेराय देशमूख, दिलिप सोनटक्के, प्रकाश मामा कोंडलवार, संतोष मारकवार, गणेश मंदिर संस्थेचे अध्यक्ष लिंगन्ना तोटावाड, सरपंच उपूवाड गंगाधर, उपसरपंच लक्ष्मण पूप्पलवार, ग्रामपंचायत सद्स्य आदीसह अनेक भावीकांनी अभिनंदन केले.

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात