श्रीगोंद्यात राजकीय भूकंप ! राष्ट्रवादीचे विद्यमान आ. राहुल जगतापांची माघार, घनश्याम शेलार NCP कडून लढणार ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून उद्या उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपाचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्याची राजकीय परिस्थिती बदलली. श्रीगोदा तालुक्यातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत आमदार जगताप यांनी माघार घेत कार्यकर्त्यांना दुसरा धक्का दिला आहे. जगताप हे भाजपाकडून इच्छुक होते. परंतु भाजपाने पाचपुते यांना उमेदवारी दिल्याने जगतापांची मोठी गोची झाली.

श्रीगोंद्यात आज आ. राहुल जगताप यांच्यासह बाबासाहेब भोस, अण्णा शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांच्यात बैठक झाली.या बैठकीत घन:श्‍याम शेलार यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, यावर एकमत झाले.

 

Visit : Policenama.com

तुमच्या मुलांच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी, उपाय जाणून घ्या
जाणून घ्या ‘सेक्शुअल लाइफ’ असंतुष्ट असण्याची कारणे, अशी घ्या काळजी
चिंच आहे बहुगुणी, उन्हाचा कडाका वाढला तर आवश्य खा

शरीरात ‘या’ ठिकाणी लपतो ‘एड्स’चा व्हायरस, संशोधकांनी केला दावा
मधुमेहाचे औषध स्तनाच्या कॅन्सरवर उपयुक्त, चिनी संशोधकांचे मत
मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
ऑफिसमध्ये जेवण करताना घ्यावी ‘ही’ काळजी, तुमच्यासाठी ठरु शकते फायदेशीर
नाभीवर लावा २ थेंब दारु, दूर होतील पीरियड्ससंबंधीत ‘या’ समस्या, जाणून घ्या