माजी मंत्री पाचपुते, आमदार राहुल जगताप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरुच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा साईकृपा व कुकडी साखर कारखान्यांनी श्रीगोंदा, आष्टी, दौंड, जामखेड, कर्जत या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उसाचे कोट्यवधी रुपयाचे बिल थकवले आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

शेतकऱ्यांचे व ऊस वाहतूकदारांचे थकीत पैसे, साखर कामगारांचे थकीत वेतन लवकर देण्यात यावे, या मागणीसाठी साखरसम्राट आणि पारंपरिक राजकीय नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते व श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप याच्या विरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी साखरेच्या घरात भाकरीचा ठिय्या आणि माय बापाहो आमची चूल विझु देऊ नका..अशी टॅगलाईन देत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष टिळक भोस यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना एकत्र करीत या शेतकरी हिताच्या प्रश्नासाठी पाचपुते यांच्या माऊली व जगताप यांच्या निवासस्थाना समोर तीव्र बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पाठींबा दिला आहे.

यावेळेस भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष अमोल उगले, सामजिक कार्यकर्ते साईनाथ घोरपडे, भूमिपुत्र शेतकरी संघटना अहमदनगर जिल्हा संघटक संतोष वाबळे भूमिपुत्र शेतकरी संघटना पारनेर तालुका प्रवक्ते राजू रोकडे, सिताराम देठे, उद्योजक गोरख वाळुंज, रावसाहेब झांबरे, संदीप जाधव, उद्योजक भरत औटी, सचिन आंधळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –