‘वादग्रस्त’ छिंदमच्या अपात्रतेच्या ठरावावरील सुनावणी ‘पूर्ण’

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदमच्या याच्या अपात्रेबाबत महासभेने केलेल्या ठरावावर नगरविकास विभागात सुनावणी पूर्ण झाली आहे. नगरविकास राज्यमंत्र्यांसमोर ही सुनावणी झाली.

महापालिकेच्या तत्कालीन सर्वसाधारण सभेत छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता. सदरचा ठराव शासनाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आला. राज्यमंत्र्यांसमोर या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली आहे. मागील सुनावणीला छिंदम याने मुदतवाढीची मागणी केली होती. त्यावर २२ ऑगस्टला पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यात छिंदमने महासभेने ठेवलेले आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात न्यायालयात प्रकरण असून, निर्णय झालेला नसल्याचेही म्हणणे मांडण्यात आले आहे.

याप्रकरणी छिंदम यांच्या अपात्रतेच्या ठरवाबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छिंदम याच्या मागील कार्यकाळात महासभेने अपात्र ठरवण्याचा ठराव घेतला होता. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत त्याचा विजय झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –