कॅन्सर झाल्याचं समजल्यावर ‘त्या’ रात्री सोनालीसोबत नेमकं काय घडलं ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही काही दिसवांपुर्वी कॅन्सर आजाराशी झुंज देत होती. काही महिन्यांपुर्वीच हायग्रेड कॅन्सरवर उपचार घेऊन ती न्यूयार्कवरुन भारतात परतली आहे. ज्या दिवशी सोनालीला तिच्या आजाराबद्दल कळाले ती रात्र सोनालीसाठी खुप कठीण होती. याविषयी ती मोकळेपणाने बोलली.

सोनाली बेंद्रे म्हणाली, की, जेव्हा मी याबद्दल ऐकले तेव्हा मला वाटले की, कोणत्यातरी ट्रेनने मला जोरात धक्का दिला आहे. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. मी त्या रात्री ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट स्विकारली आणि शेवटी हा विचार केला की मी आज शेवटचे या गोष्टीसाठी रडते की, मला कॅन्सर का झाला आणि कधी झाला. त्यावेळी मी ठरवले की, यानंतर मी कधीच रडणार नाही फक्त हसत आणि आनंदी राहीन. मी उगवत्या सूर्याकडे पाहिल आणि तो माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला. मी तो फोटो क्लिक केला आणि म्हटल. ‘Girls, Switch on the Sunshine’

सोनालीला भेटायला न्यूयार्कला गायत्री आणि सुझान आली होती. माझ्या कठीण काळात माझ्या या दोन मैत्रिणींनी मला खूप पाठिंबा दिला. प्रत्येकवेळी त्या माझ्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. मला वाटते की ते क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होते.

कॅन्सरच्या ट्रिटमेंट दरम्यान सोनाली बेंद्रे सोशल मिडियावर बरीच सक्रिय होती. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधील #OneDayAtATime आणि #SwitchOnTheSunshine हे दोन हॅशटॅग ट्रेंडमध्ये राहिले होते. सोनालीच्या सगळ्या पोस्ट तिच्या सर्व चाहत्यांना पहायला मिळाले.

नुकताच नेहा धुपियाच्या ‘BFFS विथ वॉग’ या शोमध्ये सोनालीने तिला कॅन्सर झाल्यानंतर तिची परिस्थिती काय होती याविषयी मोकळेपणाने सांगितले.