पिडीतेच्या कुटूंबियांना मदत मिळवून देण्यासाठी ग्रामीण पोलिस प्रयत्नशील : आरती सिंग

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पीडितेला सर्वोत्तम उपचार मिळावा याकरिता मी जातीने लक्ष ठेवून असून पीडितेची प्रकृती स्थिर असल्याचे सोमवारी संध्याकाळी नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी पत्रकारांना सांगितले

पीडितेच्या घटनेनंतर आज सायंकाळी लासलगाव बस स्थानकाच्या घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोलीस कार्यालयात पोलीस उपाधीक्षक माधव रेड्डी व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्याकडून तपास कार्याचा आढावा घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

या घटनेतील दुर्दैवी पीडित महिलेच्या पतीचे निधन झालेले आहे व तिला असणारे तीनही मुले लहान आहे व तिची प्रकृती स्थिती लक्षात घेता तिथे च्या मुलांसाठी शासनाच्या मनोधैर्य योजने सारख्या काही योजनेतून मदत करता येईल का याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे त्याकरिता प्रयत्नशील आहे तसेच लासलगाव बस स्थानकावर विद्यार्थ्यांची वाढती वर्दळ पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने सापडले सुटण्याच्या वेळेत वाढवली पोलीस गस्त वाढविण्याची मागणी व पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी भेटीदरम्यान स्थानिक पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली.