वाहतूक नियमांचे उल्लंघन एसटी चालकांना पडणार ‘भारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता एस टी चालकांना खूप महागात पडणार आहे. चुकीच्या पद्धतीने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्यास संबंधित एसटी चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल. कारण वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून ई-चलानद्वारे दंड आकारणी करण्यात आली आहे.

दंड न भरल्यास आरटीओमध्ये एसटीचे पासिंग होणार नाही. परळ आणि उरण आगार व्यवस्थापकाला विभाग नियंत्रणाकडून चालकांच्या पगारातून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी परळ आगारातील ११ आणि उरण आगारातील ५ तक्रारी दाखल आहेत. या तक्रारीतून संबंधित चालकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस दंडाची रक्कम वसूल करतात. यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे माध्यमातून गाडीचा क्रमांक, वेळ नमूद केली जाते. ठिकठिकाणी असलेले वाहतूक पोलीस अशा वाहनांचे फोटो काढून तक्रार दाखल करतात.

ही तक्रार परिवहन मंडळाला देण्यात येते. त्याप्रमाणे विभाग नियंत्रणाकडून आगाराचे नाव, एसटी गाडीचा क्रमांक, दिनांक, वेळ, चलान क्रमांक आणि दंडाची रक्कम यांचे पत्रक आगार व्यवस्थापकाला देण्यात येते.
कोणताही चालक जाणूनबुजून वाहतुकीचे नियम मोडत नाही. त्यामुळे दंडाची रक्कम चालकांकडून वसूल करणे अयोग्य आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. त्यातच आता दंडाची वसुली त्यांच्या पगारातून करणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, असा नाराजीचा सूर आळवत
कर्मचारी संघटनेने याचा निषेध केला आहे.

सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या