कचरा रॅम्प हटविण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

अहमदनगर : पोलीनामा ऑनलाईन – माळीवाडा भागात असलेला कचरा रॅम्प हटविण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवसापासून होत आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांनी आज गेटबंद आंदोलन केले. सदर आंदोलनाची दखल घेऊन महापालिकेने ४५ दिवसात कचरा रॅम्प हलविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी मनसेचे नितीन भुतारे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहरअध्यक्ष गजेंद्र राशीनकर, अड. अनीता दिघे, पोपट पाथरे, दत्तात्रय गाडळकर, अभिनय गायकवाड़, नंदकुमार भोसले, तुषार हिरवे, गणेश मराठे, दीपक दांगट आदींसह मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना नितीन भुतारे म्हणाले की, या कचरा रॅम्पमुळे या भागातील शालेय मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा टॅम्प तातडीने इतर ठिकाणी स्थलांतरित करावा, यासाठी या भागातील सर्व शाळा, विद्यार्थ्यांचे पालक, विविध संस्था, संघटना यांच्यासह मनसेच्यावतीने महापालिकेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने देवूनही कोणीही हा रॅम्प हलविण्यासाठी दखल घेतली नाही. त्यामुळे शेवटी मनसेचेवतीने आज हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महापालिकेच्यावतीने ४५ दिवसात हा रॅम्प हलविण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like