विभाजनाबाबत जिल्ह्यातीलच भाजप नेत्यांत ‘मतभेद’ ; पालकमंत्री व खासदारांची ‘परस्परविरोधी’ भूमिका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा विभाजन झाले पाहिजे. या भूमिकेचा मी आहे, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर काही मिनिटांमध्येच भाजपचे खासदार सुजय विखे यांनी विभाजनाच्या अगोदर जिल्ह्यातील पाण्याचे प्रकल्प मार्गी लावावेत. त्यानंतर विभाजन करा, असे मत मांडले. शिंदे व विखे-पाटील यांच्यातील परस्पर विरोधी मतामुळे भाजप नेत्यांचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जिल्ह्यातील वार्षिक आराखड्याबाबत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी ‘मी जिल्हा विभाजनाच्या बाजूने ठाम आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी विभाजन झाले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे. जिल्हा विभाजनाबाबत लवकरच निर्णय होईल, असे अपेक्षित असल्याचे सांगितले.

प्रा. राम शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्यानंतर काही मिनिटांतच खासदार विखे पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलले. ते म्हणाले की, जिल्हा विभाजनासाठी जेवढ्या पैशांची गरज आहे. तेवढ्या पैशात जिल्ह्यातील रखडलेले पाण्याचे प्रकल्प पूर्ण होतील. अगोदर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा त्यानंतरच नियोजनाचा विचार करावा.’

पालकमंत्री व खासदार यांच्यातील मतभेदानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा विभाजनाच्या निमित्ताने काही दिवसांतच पालकमंत्री व विखे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

सिने जगत –

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य