पालकमंत्री शिंदे, डॉ. विखे पुन्हा ‘ट्रोल’ ; जनावरांच्या तोंडाला लावली थेट बांधलेली उसाची मोळीच !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आज भाजप उमेदवाराच्या जामखेड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे व डॉ. सुजय विखे हे यांनी आज एका चारा छावणीला भेट दिली. दोघांनी फोटोसेशनसाठी चक्क उसाची मुळीच जनावरांच्या तोंडाला लावली. जनावरे चारा खाताना उसाचे बारीक तुकडे अथवा कुट्टी खातात की, थेट बांधलेली मोळीच खातात, याचे पण त्यांना भान राहिले नाही. भाजप नेत्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच टीकेचा विषय बनला आहे.

राजकीय नेत्यांना नेमकी कोणती गोष्ट कशी करायची असते, याचे भान नसते. याचा प्रत्यय आज जामखेड तालुक्यात आला पालकमंत्री राम शिंदे व भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे हे एका चारा छावणीत शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर जनावरांना चारा घालतानाचा फोटो काढण्याचा मोह त्यांना झाला. उसाचा बारीक केलेल्या चारा घालण्याऐवजी कार्यकर्त्यांनी त्यांना ऊसाची बांधलेली मोळीच आणून दिली. त्यांनी थेट मोळीच जनावरांच्या तोंडाला लावून फोटोसेशन केले. आता जनावरे थेट मोळीच खातात की उसाची कुट्टी करून खातात, याचे भानही या नेतेमंडळींना राहिले नाही. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. तसेच राजकीय नेत्यांचे अज्ञानही उघड झाले आहे.