भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या भेटीबाबत खा. सुनिल तटकरेंचा खुलासा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझे विचार, माझी निष्ठा केवळ शरद पवारांसोबत आहे. अफवा पसरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या भेटींसंदर्भात उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. नुकतीच सुनील तटकरे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे आता सुनील तटकरे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार अशा अफवा पसरल्या होत्या म्हणून तटकरे यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत मी शरद पवारांसोबत भक्कमपणे उभा असल्याचे सांगितले.

माझ्या #रायगड लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात काल महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट…

Geplaatst door Sunil Tatkare op Woensdag 31 juli 2019

तटकरे यांनी म्हंटले की, मी काल केवळ चंद्रकांत पाटील यांनाच भेटलो नाही तर चार मंत्र्यांना भेटलो, त्यात शिवसेनेचे मंत्रीही होते, तसेच चार सचिवांनाही भेटलो. लोकसभा निवडणुकीत मी जी कामे करण्याचे आश्वासन दिले होते, त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी मी या सगळ्यांना भेटलो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, चित्रा वाघ या नेत्यांनी आज भाजप प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीमध्ये राहिलेल्या उर्वरित नेत्यांवरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच तटकरे यांनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतल्यामुळे तटकरे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like