‘त्या’ प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंना मिळाली ‘लेडी सिंघम’ची पदवी

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – काल एका कॉल रेकॉर्डिंगवरून मोठी खळबळ माजली असतानाच नेटकऱ्यांनी मात्र त्या प्रकरणाबाबत आपले मत नोंदवताना जर कुणी एखाद्या महिलेची नाहक बदनामी करत असेल तर त्यास अशीच अद्दल घडली पाहिजे असे म्हणत सुप्रिया सुळेंना लेडी सिंघमची पदवी दिली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या एका माजी पदाधिकाऱ्यास दमदाटी केली असा आरोप करत ती रेकॉर्डिंग अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या चॅनेलवर दाखवली या नंतर सुप्रिया सुळे यांच्याबाबत प्रचंड नाराजी निर्माण होईल, असे वाटत असतानाच मात्र उलटेच झाले. सुळे यांची ती क्लिप असल्याचा दावा करून त्यांनी पहा कशी धमकी दिली आहे, असा गाजावाजा करण्यासाठी अनेकांनी व्हाट्सअप आणि फेसबुकवरून ती बातमी शेअर केली. मात्र, त्या बातम्यांखाली आलेल्या कमेंट पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. कारण अनेक नेटिझन्सनी याबाबत कमेंट करताना जर कुणी महिलांची नाहक बदनामी करत असेल तर त्यांना अश्याच पद्धतीने उत्तर द्यायला हवे असे मत नोंदवले आहे.

कुणी विनाकारण स्वतःची बदनामी का म्हणून खपवून घ्यायची असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. तर बहुतांश नेटकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना लेडी सिंघमची उपाधीच देऊन टाकली आहे. या रेकॉर्डिंग बाबत सुप्रिया सुळेंनी मात्र इन्कार केला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपणास बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांत तक्रार द्यायच्या ऐवजी यांनी मीडियात धाव घेतल्याने याबाबत सत्य समोर आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like