खा. सुप्रिया सुळेंच्या ज्या ‘कृती’वर मोठी टीका झाली ; ‘त्याच’ कृतीने नागरिकांची मने जिंकली

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – गेल्या दोन वर्षांपूर्वी खा.सुळेंनी “सेल्फी” अभियान राबवून राज्य सरकार आणि त्यातील मंत्र्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या या कृतीवर निवडणुकीत विरोधकांनी मोठी टीका करत “हमारी ताई दिल्ली मे, सेल्फी ताई गल्ली मे” असे घोषवाक्यच जणू तयार केले होते. या टिकेला आणि त्या घोष वाक्याला जनतेने मात्र चांगलेच लाताडल्याचे दिसत आहे.

बारामती लोकसभा मतदार संघामधून नुकत्याच झालेल्या निडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ‛सेल्फी’ अभियानावर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. निवडणूक काळात सोशल मीडियावर सुळेंच्या ‛सेल्फी’ बाबत हमारी ताई दिल्ली मे सेल्फीताई गल्ली मे अश्या आशयाच्या पोस्ट टाकून मोठी खिल्ली उडवली जात होती. मात्र विरोधकांचा हाच फॅक्टर आता त्यांच्या अंगलट आल्याचे चित्र पाहायला मिळतेय. सुप्रिया सुळेंच्या सेल्फी फॅक्टरला आता खुद्द जनतेमधूनच मोठी पसंती मिळताना दिसतेय. खा.सुप्रिया सुळेंच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी युवकांपासून ते आबालवृद्ध स्त्रियांपर्यंत अनेकजण सेल्फी काढण्याचा हट्ट करताना पाहायला मिळत आहेत. नागरिकांच्या या मागणीला खा.सुप्रिया सुळेही दाद देताना दिसत आहेत.

मोठ्या मताधिक्क्याने तिसऱ्यांदा निवडून आलेल्या बारामतीच्या खासदार सर्वांना मनमुरादपणे सेल्फी काढू देत असल्याने ‛नेता आणि जनता’ मध्ये परंपरागत असलेला व्हीआयपी दुरावाच निघून जात आहे. त्यामुळे लोक सुप्रिया सुळेंच्या सेल्फी अभियानाला मोठा प्रतिसाद देताना दिसत आहेत. युवावर्ग तर सेल्फी काढल्यानंतर त्या सोशल मीडियावर टाकून विरोधकांना एक प्रकारे आरसा दाखवताना दिसत आहेत. सुळेंची वाढती लोकप्रियता ही त्यांच्या जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करण्याच्या सवईमुळे दिवसेंदिवस वाढत आहे हे मात्र नक्की.