..’हा’ रिजेक्ट माल जनता कसा स्विकारेल : खा. सुप्रिया सुळे यांचा सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – २०१४ मध्ये रिजेक्ट केलेला माल सत्ताधारी नवीन पॅकिंगमधून २०१९ मध्ये बाजारात आणत आहेत. हा रिजेक्टेड माल जनता कसा स्विकारेल, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

निलेश लंके यांच्या १८ दिवसापासुन सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचा समारोप आज सायंकाळी नगर तालुक्यातील अरणगाव येथे झाला. यावेळी खा. सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राज्याचे राजकारण नवीन स्टाईलने सुरू झालेले आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर होत असून ईडी, सीबीआयचा धाक दाखवून विरोधकांना पावन करून घेतले जात आहे. पक्षातून जाणारे ते आपलेच आहेत. त्यामुळे उद्या कोणाचेही सरकार आले तरी ते आपलेच असणार आहे.

नगर-पारनेर मतदारसंघातून निलेश लंकेच आमदार होईल, असा विश्वास व्यक्त करत सुळे यांनी निलेश लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनशाम शेलार, माजी महापौर अभिषेक कळमकर, अशोक सावंत, आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like