‘बारामती’साठी सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांचे खंडोबाला ‘साकडे’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांनी जेजुरी मधून पदयात्रा काढली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विकासकामांवरून विरोधक टीका करत असले तरी त्यांना पाच वर्षातील कामे पहायची असतील तर 160 पानांचे पुस्तक काढले आहे, ते वाचून घ्या. कामाचे पुरावे सोशल मीडियावरही पाहायला मिळतील. मतदार संघातील काम पाहूनच गुणवत्तेच्या आधारावर मतदारांनी निर्णय करावा. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, नगराध्यक्षा वीणा सोनवणे, माजी नगराध्यक्ष दिलीप दादा बारभाई डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक जयदीप बारभाई, अजिंक्य जगताप आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, आघाडीमध्ये विश्वासाचे वातावरण आहे. राज्यात आघाडीची स्थिती चांगली आहे. शेतकरी दुष्काळ आणि बेरोजगारी आदी महत्वाचे प्रश्न या निवडणुकीत आहेत. सर्वच आघाडीवर भाजपाचे सरकार अपयशी ठरले आहे. जेजुरी व परिसराच्या विकास कामासाठी यापूर्वी अनेक वेळा पाठपुरवठा केला आहे. गेली पाच वर्ष जेजुरी व परिसरातील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरवठा केला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळेंना घेऊन सदानंदांची जेजुरीवर पाच पावली

सुप्रिया सुळेंना घेऊन सदानंदांची जेजुरीवर पाच पावली

Policenama ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮಾರ್ಚ್ 4, 2019

यावेळी कांचन कुल म्हणाल्या की,  बारामती शहर व परिसर वगळता लोकसभा मतदारसंघातील इतर तालुके विकासापासून वंचित आहेत. या परिसरातील मोठे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. जनतेच्या आग्रहामुळे मी निवडणूक रिंगणात असून जनतेनेच निवडणूक हातात घेतली असल्याचे कुल यांनी सांगितले. जेजुरी शहरातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कुल बोलत होत्या.

यावेळी आमदार राहुल कुल, शिवसेना तालुका अध्यक्ष दिलीप यादव, श्यामकाका पेशवे, आर. एन. जगताप, राहुल शेवाळे, सचिन लंबाते, सचिन पेशवे आदी उपस्थित होते. प्रचारासाठी फिरताना येथील नागरिक समस्या मांडत आहेत. अद्यापही मतदार संघात मोठ्या समस्या आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती येथे गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. बारामती शहराव्यतिरिक्त उर्वरित भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे कुल म्हणाल्या. त्यामुळे बारामती मधून युतीचा खासदार निवडून जाणे आवश्यक आहे. त्यामुळे परिसराचा विकास साधता येईल. युतीचे सर्व पक्ष मनापासून काम करीत असल्याने प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे राहुल कुल यांनी सांगितले. तसेच दोन्ही उमेदवारांनी खंडोबा देवाचे दर्शन घेऊन भंडारा उधळून विजयासाठी साकडे घातले.

राहुल कुल यांनी कांचन कुल यांना उचलून घेऊन जेजुरीच्या पायऱ्या चढल्या

आ. राहुल कुल यांनी बारामती लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांना उचलून घेऊन जेजुरीच्या पायऱ्या चढल्या

Policenama ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 12, 2019

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like