नागपूरात उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव

पोलीसनामा ऑनलाईन – एरवी हिवाळ्यात डोके वर काढणारा स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव यंदा उन्हाळ्यातही जाणवत आहे. विभागातील रुग्णसंख्येचा आकडा २३८ वर पोहोचला असून या आजाराने एका डॉक्टरलाही विळख्यात घेतले आहे. विभागात १ जानेवारीपासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. या आजाराची रुग्णसंख्या २३८ वर पोहोचली आहे.

गेल्या सहा दिवसांत विविध रुग्णालयांत आठ रुग्ण दगावले आहेत. त्यात शहरातील पाच जणांचा समावेश आहे. कमी प्रतिकार शक्तीमुळे रुग्णांना हा आजार होतो. मेडिकलच्या एका निवासी डॉक्टरला या आजाराने विळखा घातल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णांना लस उपलब्ध करून दिली जाते. यामुळे किंचित ताप आणि अंगदुखीचा त्रास होतो.