सोशल मिडियामुळे चित्रपटावर होतो ‘असा’ परिणाम : तापसी पन्नू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूचे म्हणणे आहे की, स्टारडम चा जादू फक्त फक्त प्रदर्शित होण्याच्या दिवशी चालत असतो. कलाकारांना सुपरस्टार होण्याचा फायदा फक्त त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पहिल्या दिवशी होतो. नंतर कुठलाही चित्रपट चालतो पण त्यावेळी चित्रपटात काही खास नसते.

View this post on Instagram

_______ is the new black ….👓 #Badla

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

तापसी म्हणाली की, एकदा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आला की संध्याकाळपर्यंत या चित्रपटात काय खास आहे हे कळते.  काही सुपरस्टार आहे जे खरच मोठे कलाकार आहेत. त्या कलाकारांना त्यांच्या चित्रपटाबरोबरच चाहत्यांचे प्रेम देखील मिळते. आजचा काळ सोशल मिडियाचा आहे. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी सोशल मिडियामुळे चित्रपटाची चर्चा होते आणि संध्याकाळपर्यंत पुर्ण चित्रपटाचा खुलासा होतो.

लोक चित्रपटाचा ट्रेलर पाहून पुर्ण चित्रपटाचा अंदाज लावतात आणि हा चित्रपट बॉक्सऑफीसवर चालेन की नाही हे त्यांना कळते. चित्रपटाची कहाणी समजण्यास प्रेक्षकांना फार काळ लागत नाही. सोशल मिडियामुळे पहिल्यासारखे राहिले नाही. आजचा काळ बदलला आहे.

You might also like