भारतातील ‘या’ कंपनीत कर्मचाऱ्यांना तब्बल १ कोटींचं ‘पॅकेज’

बंगळुरू : वृत्तसंस्था – जगाबरोबरच भारतातील कोट्याधीशांची संख्या वाढत आहे. बहुराष्ट्रीय तसेच भारतीय राष्ट्रीय कंपन्यांमधील कार्यकारी संचालकांना कोट्यावधीचे पॅकेज असते. कंपन्यांमध्ये असे काही जण दरवर्षी कोटीवर पगार घेतात. पण, देशातील एक जगभरात नावाजलेली कंपनी आहे, त्या कंपनीतील १०० हून अधिक कर्मचारी दरवर्षी १ कोटीपेक्षा जास्त पगार घेत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये कंपनीतील परदेशातील कर्मचारी आणि मुख्य कार्यकारी संचालकांना गृहित धरण्यात आलेले नाही.

टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेस असे या कंपनीचे नाव असून वर्षाला १ कोटी रुपयांहून अधिक टीसीएसमधील कर्मचाऱ्यांची संख्या या आर्थिक वर्षात १०० पेक्षा अधिक झाली आहे. या ‘कोट्यधीश’ कर्मचाऱ्यांपैकी एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांनी आपल्या करिअरची सुरुवात टीसीएसमध्येच केली आहे.

Image result for tcs company

२०१७ मध्ये टीसीएसमधील कोट्यधीश कर्मचाऱ्यांची संख्या ९१ होती. २०१९ मध्ये ती १०३ झाली आहे. या १०३ जणांत कंपनीचे सीईओ राजेश गोपीनाथन आणि सीओओ एन. जी. सुब्रमण्यमन यांना गृहीत धरलेले नाही.

भारताबाहेर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वगळण्यात आले आहे. टीसीएस कंपनीच्या आयुष विज्ञान, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा विभागाचे प्रमुख देबाशीष घोष यांची वार्षिक मिळकत ४.७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. व्यवसाय व तंत्रज्ञान सेवा विभागाचे प्रमुख कृष्णन रामानुजम यांचे वेतन ४.१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीच्या बँकिंग, वित्तीय सेवा व विमा विभागाचे प्रमुख के कृतीवसन यांचे वेतन ४.३ कोटींपेक्षा जास्त आहे.

टीसीएसचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी के. अनंत कृष्णन यांचे वेतन ३.५ कोटींपेक्षा जास्त आहे. किरकोळ विक्री आणि ग्राहक उत्पादने विभागाचे माजी प्रमुख प्रतीक पाल यांना ४.३ कोटींपेक्षा जास्त वेतन मिळाले. पाल यांना टाटा सन्समध्ये हलविण्यात आले असून, ते आता समूहाच्या डिजिटल पुढाकाराचे काम पाहत आहेत.

संचालकांच्या अहवालातील जोडपत्रातील माहितीनुसार, कोट्यधीश कर्मचाऱ्यांच्या मिळकतीत मूळ वेतनासह भत्ते, रोख प्रोत्साहने, अनुषंगिक लाभांची आयकर नियमानुसार होणारी किंमत आणि कंपनीद्वारे देण्यात येणारे भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन निधीतील योगदान यांचा समावेश आहे.
या तुलनेत इन्फोसिसमध्ये १.०२ कोटींपेक्षा जास्त मिळकत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ ६० आहे. मात्र, इन्फोसिस आपल्या कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे समभाग वितरित करते, तसे टीसीएस करीत नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

मुलांचे केस गळण्यामागे असू शकतात ‘ही’ मोठी कारणे

सावधान ! ‘या’ लोकांना ‘आइस टी’चे सेवन पडू शकते महागात

‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे

जपानचा ताप महाराष्ट्राच्या माथी