आझाद मैदानावरील उपोषणात जिल्ह्यातील ३ शिक्षकांची प्रकृती खालावली

पोलीसनामा ऑनलाईन –  १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदान व अंशतः अनुदान सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिक्षण संघर्ष संघटनेच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाचा सहावा दिवस उलटला तरी तोडगा निघालेला नाही. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. जिल्ह्यातील तीन शिक्षक नेत्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

सन २००५ पूर्वी नियुक्त असलेल्या मात्र त्यानंतर अनुदानावर आलेल्या शिक्षकांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी दि. १८ जून पासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात नगर जिल्ह्यासह राज्यातील शिक्षक सहभागी झाले आहेत. सहा दिवस उलटून तोडगा निघालेला नाही. यामधील उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसंदिवस खालावत आहे. शिक्षण संघर्ष समितीच्या नेत्या संगीता शिंदे यांची प्रकृती मंत्रालयात चर्चा करताना ढासळली. त्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. रविवारी शिक्षक नेते महेंद्र हिंगे व बद्रीनाथ शिंदे यांची प्रकृती खालवली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुनील दानवे यांची प्रकृती ही नाजूक आहे प्रशासनाने उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत राज्य सरकार लेखी आश्‍वासन देत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार शिक्षकांनी केला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगरमधील अनेक शिक्षक सोमवारी आंदोलनात सहभागी होणार आहे. तसेच शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने सोमवारी विधान भवनात चर्चा होण्याची शक्यता असल्याचे बोडखे यांनी सांगितले आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग