भोसरी, चिखली, हिंजवडीत पाच दुकाने चोरट्यानी फोडली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरात चोरट्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी तर भोसरीतील गारमेंन्टस, गिफ्ट शॉप, पुणेरी बेकर्सचे दुकाने फोडून 11 लाख 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.

भोसरी येथे सुजाराम जयवंतारामा देवासी (39, रा. लांडगेनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. देवासी यांचे इंद्रायणीनगर येथील लेमन गारमेन्टसचे, दादासाहेब भाऊराव फुके यांचे पुणेरी बेकर्स आणि सुरेशकुमार मांगेलालजी चौधरी यांचे ‘गिफ्ट’ चे दुकान चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडले. तीनही दुकानातील एक लाख 69 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

चिखली, कुदळवाडी येथील मेनरोडवरील ‘छाया मोबाईल शॉपी’च्या छताचा पत्रा व पीयुपी उचकटून चोरटे आतमध्ये घुसले. दुकानातील 54 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन, मेमरी कार्ड, पॉवर बँक आणि पाच हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बालाजी मदन येवते (35, तुकारामनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास चिखली पोलिस करत आहेत.

हिंजवडी पोलिस ठाण्यात कमलेश भजनदास लेखवाणी (31, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. लेखवाणी यांची हिंजवडीतील शिवाजी चौकात ‘द हिमालया’ या नावाने मोबाईल शॉपी आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरटे दुकानाचा मागचा पत्रा व प्लाउड उचकटून आतमध्ये घुसले. दुकानातील 8 लाख 69 हजार रुपयांचे वेगवेगळ्या नामांकित कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि 90 हजार रुपयांची रोकड लंपास केली. लेखवाणी यांनी शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपास हिंजवडी पोलिस करत करत आहेत.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

You might also like