धुळे : शिरपुरातील अयोध्याई नगरातून महिलेच्या गळयातील दागिने चोरले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिरपुरातील अयोध्याई नगरातून महिलेच्या गळ्यातील दागिने तसेच मोबाईल चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे धुमस्टाईलने चोरी करणारे चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील सुभाष कॉलनी अयोध्याई नगरात प्लॉट नं.75 येथे राहणाऱ्या सरला गोपाल राठी या सायंकाळी पायी महादेव मंदिरात देवदर्शनासाठी जात होत्या. रस्ता ओलांडताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व चैन हिसकावली. महिलेने आरडाओरड केली. परंतु चोरटे धुम स्टाईलने पसार झाले.

तसेच शिरपुर गावात पायी चालताना रोहित प्रदीप पाटील (वय 18) या विद्यार्थ्याचा 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकवून नेला. तसेच धुळे शहरातही देवपुरात शिवपार्वती कॉलनीत प्रेमलता दरबारसिंग गिरासे या महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगल पोत धुम स्टाईलने चोरट्यांनी लुटुन नेली.

सोनसाखळी, मोबाईल लुट प्रकरणी शिरपूर, देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरपूर पो.नि.शिवाजी बुंधवंत व देवपूर पो.नि. एस डी.सानप करत आहे.

You might also like