थेऊर येथील चिंतामणी मंदिर निघाले उजळून, भक्तांच्या दर्शनासाठी रांगा

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी गणपती प्रतिष्ठापनेपासून मोठी गर्दी केली असून दररोज हजारो भाविक चिंतामणी चरणी नतमस्तक होत आहेत. संपुर्ण देऊळवाडा रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. रात्रीच्या वेळी हा नयनरम्य देखावा आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी असते.

theur

बाप्पाचे आगमण झाल्यानंतर घरोघरी गणपतीची मनोभावे पूजा आर्चना केली जात असतानाच गणपतीच्या स्वयंभू ठिकाणाला भेटी देऊन बाप्पाचे आशिर्वाद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त गर्दी करताना दिसतात. येथील मंदिरात भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याची योग्य सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मंदिरात दररोज पहाटे पाच वाजता मंदिराचे पुजारी आगलावे बंधू विधिवत पूजा करुन मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले केले जाते. त्यानंतर सभामंडपात भक्त रांगा लावतात.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने दररोज दुपारी अल्पदरात महाप्रसाद दिला जातो. ट्रस्टच्या वतीने अनेक सुविधा पुरविल्या जात असल्या तरीही पिण्याच्या शुध्द पाण्याची सुविधा दर्शनबारीसाठी निवाराशेड, स्वच्छता गृहाची सुविधा अशा अडचणी आजही आहेत यावर काम होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

थेऊरगावचा समावेश राज्य शासनाच्या ‘ब’ वर्ग देवस्थानमध्ये झाल्याने भविष्यात येथे शासनाकडून मोठा निधी उपलब्ध होईल त्यामुळे भाविकांना चांगली सुविधा उपलब्ध करुन देता येऊ शकेल असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले. सध्या गावात नागरिकांना व भाविकांना अल्प दरात स्वच्छ व निर्जंतूक पिण्याचे पाणी, भाविकांना प्रशस्त वाहनतळ सुविधा पुरवली जाते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like