हेडफोन काढण्यासाठी वाकला अन् जीव गमावला

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – हेडफोनवर गाणी ऐकण्याच्या नादात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच एक प्रकार मावळ मधील तिकोणा किल्ल्यावर घडला आहे. हेडफोन काढण्याच्या नादात एक तरुण 250 फूट खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.

ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. तरुण दरीत पडल्याचे समजताच शिवदुर्ग मित्र या लोणावळ्याच्या रेस्कू टिमला पाचारण करण्यात आले. टिमने चारच्या सुमारास तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. वरण तळ्याच्या मागील बाजूस असलेल्या बुरुजावरून हा तरुण खोल दरीत पडला होता. हार्दिक विक्रम माळी (वय-20 रा. इम्प्रेस टॉवर, घोरपडी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

हार्दिक माळी हा तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यकीय शिक्षण घेत होता. तो आज सकाळी त्याच्या मित्रांसोबत तिकोणा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा वरण तळ्यच्या मागील बाजूस असलेल्या बुरजावरून तोल जाऊन दरीत पडला.

दरम्यान, तिकोणा किल्ल्यावरून तरुण दरीत पडला असल्याची माहिती शिवदुर्ग टिमला देण्यात आली. टिमने याठिकाणी तरुणाचा शोध सुरु केला. मात्र, त्याचा शोध लागू शकला नाही. अखेर दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृतदेह वरण तळ्याच्या मागील बाजूस असलेल्या बुजरजाखाली 250 फूट खोल दरीत मिळाला.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/