अखेर ठरलं ! विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ‘या’ पक्षाचे होणार, उद्या फक्त ‘एवढी’ जण शपथ घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी तीनही पक्षातील एक किंवा दोन सदस्य शपथ घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

आज तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची तब्बल चार तास बैठक झाली. बैठकीमध्ये मंत्रीमंडळाबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेस आग्रही होते. अखेर त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षपदच्या उमेदवाराचे नाव अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात राष्ट्रावादीकडून जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्षपद दिले जाईल आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल असे सांगितले जात होते. मात्र, जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याने अजित पवार यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवणार हे येणाऱ्या काही दिवसांत समजेल.

Visit : Policenama.com