‘तुला पाहते रे’च्या ‘सीजन-२’ ची मागणी, ‘ईशा’ ४० ची तर ‘विक्रांत’ २० चा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीवरील सगळ्यात प्रसिद्ध मालिका ‘तुला पाहते रे’ ने अखेर शेवटचा निरोप घेतला. प्रेक्षकांसाठी ही खूप नाराजीची गोष्ट आहे. कारण इतके दिवस ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहत होते. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. ईशा आणि विक्रांतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडली होती. प्रेक्षक खूप उत्सुकतेने ही मालिका पाहत होते पण या मालिकेच्या शेवटच्या भागाने मात्र प्रेक्षकांना नाराज केले आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1152611820340797441

ही मालिका जेव्हा सुरु झाली तेव्हाच या मालिकेचे जास्त भाग नसणार याची कल्पना दिली गेली होती त्यामुळे मालिकेची कथा खूप रेखाटली गेली होती. अचानक मालिका शेवटच्या वळणावर येऊन प्रेक्षकांनी जेव्हा याचा शेवट विक्रांत मृत्यू झाल्याचे पाहिले तेव्हा हा शेवट सगळ्यांसाठी आश्चर्यकचकित होता. ही मालिका आता पुन्हा दिसणार नाही म्हणून अनेक चाहते नाराज झाले आहेत.

‘तुला पाहते रे’ या मालिकेचा शेवट प्रेक्षकांना आवडला नाही. नुकतेच अभिनेता सुबोध भावेने प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी ट्विटरवर एक फोटो शेअर करुन प्रेक्षकांचे आभार मानले. या फोटोवर अनेकांनी कमेंट केली. कमेंटमध्ये काहींनी कौतुक तर काहींनी यासाठी नाराजगी व्यक्त केली. अनेकांनी ‘तुला पाहते रे सीजन २’ ची मागणी केली. काही प्रेक्षकांनी भावनिक कमेंट तर कोणी सीरियलची खिल्ली उडविली आहे.

एका युजरने कमेंट केली की, ‘ ‘तुला पाहते रे पार्ट २’ मध्ये विक्रांत पुर्नजन्म घेऊन तो ईशाचा बदला घेणार असल्याचे दाखवा. यामध्ये ईशा ४० वर्षाची आणि सुबोध २० वर्षाचा दाखवा त्याचबरोबर या मालिकेला टॅग लाइन ‘पुर्नजन्म भी बहुत बडी चीज होती है बाबु’ अशी द्या’ दुसऱ्या युजरने लिहले की, ‘माझी आई या सीरियलचा शेवटचा भाग पाहून खूप रडली. आयुष्यातला सर गेल्यासारखी तिची परिस्थिती होती.

‘तिसऱ्या युजरने लिहले की, ‘आम्ही तुम्हाला पुन्हा पाहू शकणार नाही. तुम्हाला खूप मिस करु. पुढच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला शुभेच्छा.’ तिसऱ्या युजरने लिहले की, ‘२९८ एपिसोड बहुत छोटी चीज होती है बाबु.’ तर एकाने लिहले की, ‘सुटलो एकदाचा’ अशा वेगवेगळ्या कमेंट करुन प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

या मालिकेच्या जागी एक नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचे नाव ‘अग्गबाई सासुबाई’ प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेला सुरुवात झाली आहे. पाहूया आता या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते की नाही.

आरोग्यविषयक वृत्त-