फक्त देखावाच नाही तर सामाजिक कार्यातही पुढे असणारा ‘तुळशीबाग गणपती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – श्री. तुळशीबाग गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५ साली पहिल्यांदा पुण्यामध्ये फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती आहे. १३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे. या गणपतीला ८० किलो वजनाची चांदीची आभुषने आहेत. कलाकार डी. एस. खटावकर गेली अनेक वर्षे या गणपतीची सजावट करत आहेत.

Image result for तुळशीबाग गणपती पुणे

या मंडळाच्या स्थापनेत दातार काँट्रॅक्टर, कावरे आईस्क्रीमवाले, सदाशिवराव तथा बुवा पवार, आबा खटावकर, बोलोबा वाळके, बंडोपंत ढवळे, हरिभाऊ शेटे, वनारसे, दिवेकर, खटावकर यांचा सहभाग होता. तुकारामाचे वैकुंठगमन, अमृतमंथन, भीम-धृतराष्ट्र, अहिरावण-महिरावण असे अनेक गाजलेले देखावे मंडळाने सादर केले आहेत. साधारण ९० च्या दशकात तयार देखावे आणले जाऊ लागले त्यानंतर गेल्या चौदा-पंधरा वर्षांत स्थिर देखावे, म्युरल्स या प्रकारांचा वापर देखाव्यात केला जाऊ लागला आहे.

Image result for तुळशीबाग गणपती पुणे

हे गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यातदेखील सहभाग घेते. दर वर्षी अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. अनाथ मुलींना तुळशीबागेत दिवाळीनिमित्त कपडे खरेदीची संधी दिली जाते. अंध, अपंग, मतिमंद, वृद्ध आणि अनाथांना संस्थेमार्फत नियमित मदत केली जाते.

Image result for तुळशीबाग गणपती देखावा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like