पुण्यातील बालाजीनगरमध्ये ७ दुचाकी पेटवून दिल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या पेटवून देण्याचे लोण थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्यात पहाटे सातारा रोडला पुन्हा एकदा गाड्या पेटवून देण्याचा प्रकार घडला असून त्यात ७ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. पुणे सातारा रोडवरील बालाजीनगर येथील एॅलोरा पॅलेस येथे पहाटे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर येथे गाड्यांना आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी मिळाली. त्यानंतर कात्रज येथील गाडी तातडीने घटनास्थळी पोहचली. जवानांनी काही मिनिटातच ही आग विझविली. तोपर्यंत तेथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या ६ गाड्या जाळल्या. तर एका दुचाकीला आगीची झळ बसली होती.

या गाड्यांच्या आगीच्या ज्वाला इतक्या मोठ्या होत्या की, त्या ठिकाणाहून वरच्या बाजूने गेलेल्या वायरीही जळून खाली लोंबकळत होत्या. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

या ठिकाणीच्या वायरींना शॉर्ट सर्किट होऊन त्यामुळे गाड्या पेटल्या की, गाड्या पेटवल्याने त्याचा जाळ वरपर्यंत जाऊन वायरी पेटल्या हे समजून येत नाही. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

Loading...
You might also like