होय मी ‘चक्रम’, हे पिसाळलेलं कुत्र मला चावलं तर रेबीज व्हायचा ; शरद पवारांची मध्यस्थी ‘निष्फळ’, उदयनराजे बैठकीतून बाहेर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खासदार उदयनराजे आणि रामराजे निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. शरद पवार यांनी केलेली मध्यस्थीदेखील निष्फळ ठरली आहे. उदयनराजे आज झालेल्या बैठकीतून बाहेर पडले आहेत. तर या वादामुळे राष्ट्रवादीत आता दोन राजेंमध्ये पेटलेली ठिणगी आता चांगलीच पेटली आहे.

काय म्हणाले उदयनराजे ?

ते सभापती आहेत, सुसंस्कृत आहेत

मी कोणावर आरोप करत नाही. रामराजे सभापती आहेत. सुसंस्कृत आहेत. वयाने मोठे आहेत. काहीही बोललेलं काहीही खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही स्वत: ला स्वयंघोषित छत्रपती म्हणा.

मी या घराण्यात जन्मलो हे माझं भाग्य

मी भाग्य समजतो की मागच्या जन्मी पुण्य केलं असेल म्हणून या मोठ्या घराण्यात जन्माला आलो नाही. मी कोणाचं वाईट केलं नाही. मी राजकारण केलं नाही. तर समाजकारण करतो. मी घराण्याचं नाव घेऊन राजकारण केलं नाही.

होय मी चक्रम आहे

मला चक्रम म्हटलं जातं. होय मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतो. लोकांवरती अन्याय सहन होत नाही. मी बोलतो. मग काय तर घरचा आहेर. मी या बाबतीत चक्रम आहे.

पिसाळलेलं कुत्र मला चावलं तर रेबीज व्हायचा

रामराजे वयाने मोठे आहेत. त्यांचं ज्ञान जास्त आहे. हा वाघ बघितला आहे. म्हणून नशीब हे पिसाळलेलं कुत्रं मला चावलं नाही. पवार साहेबांनी याबाबत निर्णय घ्यावं. मी माणूस म्हणून जगणार. हे पिसाळलेलं कुत्रं मला चावलं तर उगाच रेबिज व्हायचा. मला भुकायचं नाही.

मला मतदारसंघातील लोकांनी जे विचारलं त्याचं उत्तर दिलं

मी काय चुकीचं बोललो. मी पवार साहेबांनाही विचारलं की माझी काय चूक झाली. मी त्यांच्याच आकडेवारीवरून बोललो. माझा काय संबंध आहे. चार वर्षात धरण पुर्ण झालं. ५० किमीचे कॅनल झाले. १४ वर्षात ५ किमी कॅनल झाले. लोकांना न्याय मिळाला पाहिजे. प्रकल्प उभा करतो. त्या प्रकल्पातून कोणाला काय फायदा होतो. याचा विचार केला जातो. जे लिहिलं ते वाचलं. मी होतो काय खात्याचा मंत्री. गिरीश महाजनांनी अध्यादेश काढला. ते आधी त्यांनी काढला असता तर.

रामराजे माझ्या वयाचे असते तर …

पवार साहेबांना विचारा. मी काय बोललो त्याच्याबद्दल इतरांना विचारा. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती. वयाचा मान राखतो.

सिने जगत –

 

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

वर्ल्डकप २०१९ : …म्हणून बिग बी अमिताभ, ऋषी कपूर ICCवर ‘नाराज’

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

Loading...
You might also like