गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांच्या नावाच्या ‘पाट्या’, उदयनराजेंचे समर्थक ‘आक्रमक’ (व्हिडीओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांवरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून मोठा वाद निर्मण झाला आहे. पुस्तक मागे घेतले असले तरी वाद मात्र मिटण्याचे नाव घेत नाही. या पुस्तकावरून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे वंशजांना मान्य आहे का? असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे वंशाचा पुरावा मागितला होता. त्यामुळे राजकीय वातावरण अजूनच तापले. याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी देखील उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत .

आज साताऱ्यात गाढावांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या टाकून उदयनराजे समर्थकांनी निषेध आंदोलन केले. यावेळी पोवई नाका चौकात गाढवांची धिंड काढत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात उदयनराजे समर्थक हजर होते. यावेळी समर्थकांकडून संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत रोष व्यक्त करण्यात आला.

“प्रत्येकवेळी संजय राऊत हे बंद खोलीतूनच बोलतात, पण त्यांनी प्रत्यक्ष बाहेर येऊन बोलावं”, असे आव्हान यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केले. त्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य देवतेच्या वंशजांवर टीका केली आहे ते खपवून घेणार नाही, असे देखील म्हटले आहे. यावेळी सुनील काटकर, संदीप शिंदे आणि उदयनराजे समर्थक उपस्थित होते.

काय म्हणाले होते संजय राऊत ?
संजय राऊत यांनी उदयनराजेंना थेट छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावेच मागितले होते. छत्रपतींच्या गादीबद्दल आदर असल्याचं संजय राऊत यांनी आवर्जून सांगितलं. पण उदयनराजे हे भाजपचे नेते आहेत, विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत, असंही राऊत यांनी म्हटले होते.

संजय राऊत यांचे ट्विट
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे… छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती उदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला… हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे… त्या बद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/