#Video : CM ‘ऑफिस’ जर ‘कास’ पठार’ला घेणार असतील तर ‘मी’ मुख्यमंत्री होतो : खा. उदयनराजे
सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – जर ऑफिस कासला घेणार असतील तर मी मुख्यमंत्री होण्यास तयार आहे, असे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर लक्ष वेधले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलने उत्तरे दिली.
‘चार भिंतीत बसून काम करायला मी कारकून नाही, आपल्याला जे जमत नाही ते करायचे नाही. मला जर मुख्यमंत्री व्हायचे असते तर मी तशी पावले टाकली असती, पण जर ऑफिस जर कासला होणार असले तर मी तयार आहे, येऊ द्या सगळ्यांना इकडे’ असे म्हणत त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्य़तीत नसल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत त्यांनी नीरा देवधर धरणाच्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. बारामतीकरांनी १४ वर्षे पाणी पळवल्याचा घणाघाती आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
सातारामध्ये कृषी विद्यापीठ, मेडीकल कॉलेज, सब सेंटर ही काम मागेच व्हायला हवे होते. मात्र ही कामे झाली नाहीत. जे पदावर होते, जे सत्तेत होते त्यांनी ही कामे का केली नाहीत. ते देखील जिल्ह्याचे सुपुत्र होते मग कामे का झाली नाहीत. जो प्रश्न मला पडला आहे तोच प्रश्न सर्वसामान्यांना देखील पडला आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय
कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद
रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे