परदेशी विद्यार्थ्यांचा दारूच्या नशेत ‘राडा’, पोलिसांसह नागरिकांना ‘शिवीगाळ’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युंगाडा देशाच्या तरुणाने मद्याच्या नशेत राडा घालत पोलिसांसह जमलेल्या नागरिकांना शिवीगाळकरून तुफान गोंधळ घातळ्याची घटना कोंढवा मध्यरात्री भागात घडली. तरुणाने स्वतः;ला जखमा करून घेतल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार संतोष नाईक यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा युंगाडा येथील असून काही वर्षांपासून शिक्षणानिमित्त पुण्यात आहे. एका महाविद्यालयात तो बीबीएचे शिक्षण घेत आहे. दरम्यान गुरुरवारी रात्री उबेर कार चालक शाम तिडके (वय २७) तरुणाचे हे भाडे घेऊन कोंढवा पोलीस चौकीपासून जात असताना त्याने शाम यांना शिवीगाळ अचानक करून स्टेरिंग वळविले. यामुळे शाम यांनी कार थांबविली. यावेळी त्याने शाम याना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. यावेळी फिर्यादी व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही नागरिकही जमा झाले. यावेळी मद्यपान केलेल्या या तरुणाने नागरिकांनाही शिवीगाळ करत तुफान राडा घातला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. परंतु त्याने स्वतःला जखमा करून घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी तो तरुण नाव किंवा इतर माहिती पोलिसांना देत नव्हता. त्यांच्या जवळ काहीच कागदपत्रे मिळाली नाहीत. यामुळे पोलिसांना अडचणीला सामोरे जावे लागले. उपनिरीक्षक बी. बी. मांजरे यांनी त्यांची पूर्ण माहिती काढली. यावेळी त्याच्या एका मित्राबाबत समजले. त्याची भेट घेतल्यानंतर तो एका महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे समजले. त्यांने तो युंगाडा येथील असल्याचे सांगतिले. अधिक तपास उपनिरीक्षक बी. बी. मांजरे हे करत आहेत.

Visit : Policenama.com