अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या ‘या’ मालमत्तेचाही लिलाव !

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मुंबईपाठोपाठ आता दाऊदच्या मूळ गावी खेड तालुक्यातील मुंबके येथे मूल्यांकन पथक पोहोचले असून, सोमवारी या मालमत्तेची पाहणी करण्यात आली.

मालमत्तांचे मूल्यनिर्धारण करण्याचे काम आयकर विभागाचे अधिकारी जोसेफ व त्यांच्या सहाय्यकांनी केले. पुणे येथील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्यांवर हे काम सोपविले आहे. कुख्यात डॉन दाऊद याच्या सर्व मालमत्तांवर टाच आणली जाणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दाऊदची बहीण हसिना पारकर हिची मालकी असलेल्या मुंबईतील एका सदनिकेचा १ कोटी ८ लाख रुपयांना लिलाव करण्यात आला होता.

खेड तालुक्यातील मुंबके हे दाऊद याचे मूळ गाव. येथे दाऊद व त्याच्या नातेवाईकांच्या नावे मालमत्ता आहेत. मुंबके येथे दोन मजली बंगला, सुमारे एक एकर जागेत २५-३० झाडांची आंबा कलम बाग, लोटे एमआयडीसी येथे महामार्गावर पेट्रोल पंपासाठीचा प्लॉट व अन्य एक प्लॉट एवढी मालमत्ता हसिना पारकर व त्याच्या आई अमिनाबीच्या नावावर आहे. दाऊद व त्याचे नातेवाईक मुंबके येथील त्याच्या बंगल्यामध्ये १९८० च्या सुमारास येत असत.

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर मुंबके येथील दाऊदच्या आईच्या नावे असलेला बंगला ओस पडला आहे. दाऊदच्या कुटुंबातील अनेकजण परदेशात स्थायिक झाले असून, दाऊदनेही भारतातून पलायन केले आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीने आता दाऊद व त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी पुणे येथील जिल्हा मूल्यनिर्धारण अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. दाऊदच्या एकूण चौदा मालमत्तांची किंमत ठरविण्यात येणार आहे.

मुंबके येथील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दुपारी तीन-चार तास या जागांची पाहणी करून, नकाशावर त्या पडताळून हे पथक रवाना झाले. रेडीरेकनरनुसार या जागांचे मूल्य किती होईल, हे निश्चित केल्यानंतर त्याचा लिलाव केला जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा