‘कारगिल विजय दिना’निमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत दाखविणार ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सिनेमागृहात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी २६ जुलैच्या सकाळी १० वाजता “उरी द सर्जिकल स्ट्राइक” हा हिंदी चित्रपट मोफत दाखविला जाणार आहे. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखविण्याचे प्रयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे. यासंबंधीचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहे.

परिपत्रकात म्हंटले आहे की, देशभरात 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यातील युवकांमध्ये सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृद्धिंगत व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 18 ते 25 वयोगटातील युवकांना या चित्रपटातून प्रेरणा मिळावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या परिपत्रकातून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृह चालक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांची बैठक आयोजित करावी असे आदेश परिपत्रकात देण्यात आले आहेत. अन्न व नागरी पुरवठा,ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आले आहे.

उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट याच वर्षी 11 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. 2016 मध्ये भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशनवर हा चित्रपट आधारित आहे.

आरोग्यविषयक वृत्त –