विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा ७७ जागांवर ‘डोळा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला ४८ पैकी केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. मात्र या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी टफ फाईट दिली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. महिन्याभरात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्याचा विचारही सुरू आहे. येत्या आठवड्यात याबाबत आघाडीची बैठक होणार आहे. एकूण जागांपैकी ७७ जागांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

भारिप-बहुजन महासंघाच्या सत्ता पदावर असलेल्या काही लोकप्रतिनिधींना भूमिका घेणे व पक्षाशी हातमिळवणी करणे आवश्यक वाटते मात्र महाराष्ट्र विकासाचे मॉडेल सादर करण्याची संधी प्रत्यक्षात आणता येणार असल्याने वाटेकरी न शोधता प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे दोघे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी एका वृत्तपत्राने संपर्क साधला असता दोघांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा पुनरुच्चार केला.

याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारची अनास्था हा विषय महत्त्वाचा आहे आणि समाजातील वंचितांसाठी आम्ही निवडणूक लढवू “असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांनी सांगितले.

काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने जागावाटप चर्चेत कस्पटासमान लेखले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल ४२ लाख मते मिळवल्यानंतरही कोणताही संपर्क साधलेला नाही. याशिवाय काँग्रेसची जागा घेण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याने आता हात मिळवणी नकोच, असे पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील ५५ ते ७७ विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी विचारांवर निष्ठा असलेल्या उमेदवारांना आजवर झालेल्या निवडणुकांत पहिल्या क्रमाकांचे किंवा दुसऱ्या, तिसऱ्या जागेवर स्थान मिळाले होते. या जागांवर भर देण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत ११ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी ने मागे टाकले आहे. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ याप्रमाणे सरासरी लक्षात घेतल्यास ६६ एवढी होते या भागात लक्ष द्यायचे ठरवले आहे.