अवघ्या 14 व्या वर्षी वीरप्रतापसिंह उदयनराजे भोसलेंनी मिळवलं ‘हे’ प्रमाणपत्र, जाणून घ्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 14 वे वंशज म्हणजे सातार्‍याचे माजी खा. उदयनराजे भासले हे त्यांच्या आगळया वेगळया स्टाईलमुळे आणि त्यांच्या कामामुळे लाखो लोकांच्या मनावर राज करतात. अलिकडेच उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला. सातार्‍यातील पोटनिवडणूक देखील आता जाहीर झाली आहे. सातारा जिल्हयात मोठया राजकीय घडामोडी होत असतानाच उदयनराजेंचे पुत्र वीरप्रतापसिंह भोसले यांनी देखील आपल्या वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवलं आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या थायलंड येथील फुकेटमध्ये संपन्‍न झालेल्या आशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत विरप्रताप यांनी अवघ्या 14 व्या वर्षी प्रमाणपत्र मिळवलं आहे.

वीरप्रतापसिंह यांनी केलेल्या कामगिरीचं सर्वांकडूनच कौतुक झालं. त्यांच्या यशाबद्दल स्वतः उदयनराजेंनी देखील त्यांचं खुप कौतुक केलं. एका मराठी वृत्‍तवाहिनीशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, मी माझ्या मुलाला असं ट्रेंड केलं आहे की तो माझ्यापेक्षा देखील अधिक चांगल्या पध्दतीनं जनतेची काळजी घेईल. स्कुबा डायविंग त्याचा छंद आहे. त्याच्या कामगिरीबद्दल मला सार्थ अभिमान आहे असं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजेंना 2 अपत्ये असून वीरप्रतापसिंह हे मोठा आहे तर त्यांची दुसरी मुलगी नयनतारा भोसले या पुण्यात शिक्षण घेत आहेत. वीरप्रतापसिंह हे चैन्‍नई येथे शिक्षण घेत आहेत.

Visit : Policenama.com