आमदार विजय काळेंची मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे पाठ, शिवाजीनगर मतदार संघात नवीन उमेदवार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेअंतर्गत आज शिवाजीनगर मतदार संघामध्ये फडणवीस यांची आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद असताना मतदार संघाचे आमदार विजय काळे हेच अनुपस्थित राहिल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे एकीकडे अन्य पक्षातून मेगा भरती सुरू असतानाच पुणे भाजपमध्येही अलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शिवाजीनगर मतदार संघातील आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेस भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , खासदार गिरीश बापट यांच्यासह शहरातील सहाही मतदार संघाचे आमदार उपस्थित होते. परंतु शिवाजीनगर मतदार संघात पत्रकार परिषद असूनही त्या मतदार संघाचे आमदार विजय काळे यांची अनुपस्थिती आज ठळकपणे जाणवत होती.

मागील काही दिवसांपासून शिवाजी नगर मतदार संघातून भाजप उमेदवार बदलणार अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेकजनांनी या मतदार संघातून तयारी सुरू केली आहे. मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून येणाऱ्यांना पक्ष पुन्हा संधी देईल, अशी शक्यता कमीच असल्याचे मागील लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. याच अनुभवाच्या जोरावर अनेक इच्छुकांनी  शिवाजीनगर मतदार संघातून तयारी सुरू केली आहे. अशातच विद्यमान आमदार विजय काळे यांची मुखयमंत्र्यांच्या त्यांच्याच कार्यकक्षेतील कार्यक्रमाकडे पाठ फिरवणे काळे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. काळे यांची ही अनुपस्थिती त्यांच्या समर्थकांसाठीही चिंतेचा विषय झाल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like